गौण खनिज अवैध उत्खनन नियंत्रण समिती स्थापन
औरंगाबाद, 9 - गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांचा परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आणि अनधिकृत उत्खनन व वाहतूकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य असून जिल्हा खनिकर्म अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतुक,अवैध गौण खनिज साठा निदर्शनास आल्यास शहरी भागासाठी पोलीस आयुक्त शहर व्हॉटस अप क्रमांक :- 83900022222, शहर कंट्रोल रुम 100,2240500 तसेच गामिण भागातील जनतेसाठी व्हॉटस अप क्रमांक -:7768932222 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क करणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकरी ,औरंगाबाद यांनी कळविले आहे.