Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबडकर समाज भुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


जालना, 9 - समाज कल्याण क्षेत्रात अनुसूचित जाती ,जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण कार्य तसे शारिरीक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्टरोगी इत्यादी समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणार्‍या नामवंत समाज सेवक व सामाजिक संस्था यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना यांनी केले आहे.
पुरस्काराच्या अटी व शर्थी पुढीलप्रमाणे व्यक्तीगत पुरस्कारासाठी वरील क्षेत्रात कमीत कमी समाज सेवेत 10 वर्षे कार्य केलेले असावे,पुरषासाठी वयोमर्यादा 50 वर्षे आणि स्त्रियांसाठी 40 वर्षे आहे. या पुरस्कारासाठी जात,धर्म,लिंग,क्षेत्र इत्यादी विचार केला जाणार नाही. सामाजिक संस्थासाठी समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय निर्मुलन,अंधश्रध्दा,रुढी निर्मुलन,जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था या पुरस्कारासाठी पात्र राहतील. सदर संस्था सोसायटीज रजिस्टेशन अ‍ॅक्ट,1950 नुसार नोंदणीबध्द असावी तसेच वरील क्षेत्रात संस्थेचे कार्य 10 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
पात्र उमेदवारांनी व संस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,समाज भुषन पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. 25 जानेवारी 2016 पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जालना येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे संपर्क साधावा.