Breaking News

ेवनार डम्पिंग ग्राऊंडवर पुन्हा भीषण आग

मुंबई, प्रतिनिधी, दि. 31 - मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आज सकाळी पुन्हा भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तसेच 6 वॉटर टँकर्स दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जेसीबी आणि पोकलेन मशीन्सही पाठवण्यात आली आहेत. मात्र जोरदार वार्‍यामुळे आग आणखीनच धुमसत चालली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर गुरूवारी पहाटे लागलेली आग शर्थीच्या प्रयत्नांनंतरही शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत विझली नव्हती. आणइ आज सकाळी पुन्हा आग भडकली असून धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या आगीमुळे पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर आणि देवनार परिसरात धूरामुळे दिवसभर वातावरण प्रदूषित झाले होते.
दरम्यान या आगीप्रकरणी महापालिका आयुक्तांशी आपले बोलणे झाले असून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले आहे. 
डम्पिंग ग्राऊंडचा धूर बी.के.सीला घेऊन जाणार 
पहिले डम्पिंग ग्राऊंडचा विषय मार्गी लावा नंतर ’मेक इन इंडिया’चा विचार करा असे सांगत दरम्यान या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पहिले ’मेक मुंबई’ मग ’मेक इन इंडिया’ असे सांगत बीकेसी मैदानावर आंदोलन करून परदेशी गुंतवणूकदारांना डम्पिंग ग्राऊंडच्या ज्वाळा दाखवू असे ते म्हणाले. इतके वर्ष सत्ता महापालिकेवर सत्ता असतानाही शिवसेना- भाजपाने  काय काम केलं आहे, हे जगालाही कळू दे, अशी टीका अहिर यांनी केली.