सांगलीत इंधन बचाव जनजागृती रॅली
सांगली, 24 - इंधन बचाव व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त येथे जनजागृती रॅली काढण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी व एल.पी.जी. चे व्यवस्थापक व एल.पी. जे. चे व्यवस्थापक सत्यन नायर व प्रमुख पाहुणे वाहतूक पोलिस निरिक्षक दादासाहेब चुडाप्पा उपस्थित होते.नायर म्हणाले, आपल्या देशास इंधन आयात करावे लागते. आदर्श नागरीक म्हणून आपणच पेट्रोलियम पदार्थांचा नाहक उपयोग टाळला पाहिजे. वाचणार्या इंधनाचा देशाच्या विकासासाठी उपयोग होणार आहे. यावेळी वाहतुकीच्या नियमांची माहिती गॅस एजन्सीतील चालकांना देण्यात आली. सांगली गॅस सर्व्हिस, स्वाती भारत गॅस व जयभारत गॅस यांच्यातर्फे हा उपक्रम झाला.अधिकारी एम. मोहनराव व विशाल चव्हाण, सांगली गॅस सर्व्हिसच्या उषा कुत्ते, माजी आमदार नितीन शिंदे, पूनम सुल्ह्यान, अण्णासाहेब लेंगडे आदींसह कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.