पवार, शिंदे, दळवी, सातपुते जिल्हा क्रीडा पुरस्काराचे मानकरी
अहमदनगर । प्रतिनिधी । 24 - जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार (सायकलिंग) व पौर्णिमा शिंदे (अँथलेटिक्स). गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अभिजित दळवी (धनुर्विद्या) तर गुणवंत क्रीडा संघटक पुरस्कार बळीराम सातपुते (कबड्डी) यांना जाहीर झाला असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत दरवर्षी दोन गुणवंत खेळाडू (1 पुरुष व 1 महिला), एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, असे
चार पुरस्कार प्रदान करण्यात येतात. तसेच एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा, यूथ ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूस हे पुरस्कार देण्यात येतात. दहा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखालील शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा. आर. पी. डागवाले, अंजली देवकर, क्रीडा अधिकारी अनिल चोरमले, क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर, स्वरांगी सहस्त्रबुद्धे, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या समितीने पुरस्कारांसाठी नावे निश्चित केली.