सातपूर येथे विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम
सातपूर/प्रतिनिधी। 9 - ब्रह्मलीन शिवचैतन्य स्वामी महाराज यांनी घालून दिलेल्या प्रथेनुसार मानसपुत्र ज्ञानेश्वर आंधळे यांच्या पुढाकाराने सातपूर येथील ग्रामदैवत असलेल्या संतोषी माता मंदिर येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कष्टकर्यांच्या मुलांना नववर्षानिमित्त गोडधोड खाता यावे याकरिता शिवचैतन्य स्वामी यांनी अन्नदानाची ही प्रथा सुरू केली होती. त्याच्या निधनानंतर ही प्रथा ज्ञानेश्वर आंधळे पुढे नेत आहे. यावेळी मनपा शाळा क्र.21 च्या विद्यार्थ्यांनी विविध भक्तिगीते सादर केली. यावेळी शाळेचे शिक्षक राजेंद्र शिंदे, सुनंदा सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महापालिकेचे उपअभियंता रमेश पाटोळे, कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लिट्टे, पायल आंधळे, संजीवनी आंधळे, गुलाब पगारे, प्रल्हाद भुजबळ, केशव शेळके, नवृत्ती जाधव, नाना प्रधान, श्याम अंडागळे, राहुल सरोदे, भिकन वाळके, दीपक पारखे आदिंनी प्रयत्न केले.