24 जानेवारीला देवळा मॅरेथॉन 2016
देवळा /प्रतिनिधी। 9 - रविवार दि. 24 जानेवारी रोजी देवळा मॅरेथॉन 2016 चे आयोजन करण्यात आले असून क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. अशी माहिती डॉ. प्रशांत निकम यांनी यांनी पत्रकार परीषदेत दिली. त्यांच्या समवेत आ. डॉ. राहूल आहेर उपस्थित होते. स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून देवळा नगराध्यक्षा सौ. धनश्री आहेर आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आ. डॉ. राहूल आहेर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचे मार्गदर्शक म्हणून जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर आहेत. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्रसिंग तसेच नाशिक जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवणार्या देवळा तालुक्याच्या दुर्गा देवरे व प्रतिष्ठेची अमेरीकेतील सायकल स्पर्धा जिंकून नाशिकचे नाव जगभर पोहचविणारे महाजन बंधू उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, शिवशाहिर यशवंत गोसावी, महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा प्रामुख्याने चार गटात घेण्यात येणार आहे. पहिला गट - 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 3 कि.मी., दुसरा गट - 17 वर्षांखालील मुला-मुलींसाठी 5 कि.मी. तिसरा गट - परिसरातील सर्व अबाल वृध्दांसाठी 3 कि.मी आणि चौथ्या गटात सर्वांसाठी 11 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी खुल्या गटात 100 तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 50 रूपये फि आकारण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी सर्वाधिक 11 हजार रूपये बक्षीस टेवण्यात आले असून याशिवाय 5 बक्षीसे प्रत्येक गटात ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2016 असून प्रवेश अर्ज जि.प. विद्यानिकेतन देवळा, सुनिल देवरे, देवळा महाविद्यालय बी.डी.खैरनार, डॉ. प्रशांत निकम, आ. डॉ. राहूल आहेर यांचे संपर्क कार्यालय, डॉ. अभिजीत पगार, डॉ. सुभाष आहेर, डॉ. महेंद्र शिंदे, डॉ. प्रशांत देवरे (उमराणा) येथे उपलब्ध राहणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आ. डॉ. राहूल आहेर, डॉ. प्रशांत निकम, डॉ. अनिल चव्हाण, डॉ. संजय शिरसाठ, लक्ष्मिकांत आहेर, प्रदिप आहेर, डॉ. अभिीजत पगार, डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. सतिश वाघ, प्रितेश आहेर, रजत आहेर, पिंटू शिंदे, आदिंसह पदाधिकारी प्रयत्नशिल आहेत.