Breaking News

जी.डी.सावंत महाविद्यालयात चर्चासत्र


 नाशिक/प्रतिनिधी। 20 - गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी. डी. सावंत महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ’गुणवत्ता सुधार योजने’अंतर्गत संगणक विभागातर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव अशोक सावंत होते. 
या चर्चासत्रात प्रा. पी. एम. यावलकर, प्रा. डी. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. एन. आर. कापडणीस, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. बी. बोडके, प्रा. के. व्ही. शेंडे, प्रा. एस. एम. फिस्के आदि उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन. आर. कापडणीस यांनी सांगितले की, संगणक क्षेत्रात नवनवीन आव्हाने आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारिक पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी संशोधनपर कार्य करणे कसे गरजेचे बनले आहे, ते अनेक दैनंदिन उदाहरणे देऊन स्पष्ट केले. 
अशोक सावंत यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती आपली माहिती इंटरनेटच्या माध्यमातून स्टोरेज करत आहे. पण व्हायरसच्या माध्यमातून माहिती हायजॅक केली जाते. प्रत्येक व्यक्ती या समस्येने ग्रासला आहे. यातून आपण कसा मार्ग काढणार हा प्रश्‍न आहे, सदर दोन दिवसीय चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एस. एस. साने, प्रा. राकेश पाटील, प्रा. एम. एम. शेलार, प्रा. व्ही. डी. वानखेडे, डॉ. एम. यू. खरात, डॉ. पी. एम. यावलकर, डॉ. डी. व्ही. पाटील आदि अभ्यासक उपस्थित होते. या चर्चासत्रात सहभागी प्रा. एस. बी. ठाकूर, प्रा. प्रतिमा भलेकर, प्रा. रोहिणी पवार, प्रा. वृषाली वानखेडे, प्रा. प्रज्ञा बापट, प्रा. प्राजक्ता दिवटे इत्यादी प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.