Breaking News

गोरख शेवाळे यांना कृषिरत्न पुरस्कार


 नाशिक/प्रतिनिधी। 4 -  जय किसान र्फार्मस फोरमतर्फे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल जायखेडा येथील गोरख पंडित शेवाळे यांना कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जळगाव येथील कांताई सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्र मात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास आत्माचे माजी संचालक डॉ. मंगेश देशमुख, डॉ. रमेश ठाकरे, आमदार राजेंद्र भोळे व चंद्रकांत सोनवणे, प्रयाग कोळी, राखी सोनवणे, उद्योजक अशोक जैन, डॉ. संतोष जाधव, जयराम पूरकर, भारत कृषक समाजचे अध्यक्ष प्रकाश मानकर आदि उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्यातील जळगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, सोलापूर, वाशीम आदि जिल्ह्यांतील शेतकर्यांचाही सन्मान करण्यात आला.