Breaking News

शिरसगावच्या उपसरपंचपदी राजाराम गवारे


श्रीरामपूर प्रतिनिधी :- तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या शिरसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजाराम गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची सूचना प्रवीण गवारे यांनी मांडली. यासाठी नानासाहेब गवारे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज माघार घेतला. पूर्वीच्या कार्यकारिणीची मुदत दि. २१ जानेवारीपर्यंत होती. परंतु दि. १७ जानेवारीला ग्रामसेवकाऐवजी नूतन सरपंच यांनी नोटिसा काढल्याबद्दल विरोधी सदस्यांनी हरकत घेतली होती. तरीही प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यकार्यकारी सुमंत मोरे यांनी सर्व अहवाल पाहून उपसरपंच राजाराम गवारे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. ग्रामसेवक व्ही. डी. केदारी, कामगार तलाठी दीपक साळवे यांनी याकामी सहकार्य केले. यावेळी प्रकाश गवारे, गोरख गवारे, सुभाष गवारे, शंकरदादा गवारे, दत्तात्रय गवारे, बबन गवारे, शीतल गवारे, संजय गवारे, संगीता आल्हाट, चैताली गवारे, चंदा जाधव, रविंद्र सुतार, मनोज मोरे, मंगल ताके, सनी बोरुडे आदी उपस्थित होते.