विदर्भात वस्त्रोद्योग उद्योगाला चालना देणार ः रविकांत तुपकर
बुलडाणा (प्रतिनिधी) । 10 - देशात कापुस उत्पादनाची सुपीक जमीन ही मुख्यतः विदर्भात आहे. ज्या विदर्भामध्ये पांढरं सोनं पिकविल्या जातं. त्याच विदर्भातील शेतकरी मात्र आत्महत्या करतो, ही दुर्देवी बाब आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विदर्भात वस्त्रोद्योग उद्योगाला चालना देणार असल्यावचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी केले. नागपूर येथे टेक्सटाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 7 जानेवारी रोजी एक भव्य देशव्यापी टेक्सटाईल परिषद पार पडली. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी या भव्य परिषदेला कृषी वैज्ञानिक डॉ.सि.डी. मायी, टेक्सटाईल असेसरिज अॅण्ड मशिनरीजचे अध्यक्ष मयांक रॉय, टेक्सटाईल असोसिएशनचे डायरेक्टर जनरल डॉ.एम.डी.म्हात्रे, सचिव डॉ.हेमंत सोनारे, डॉ.आर.के.दुबे, व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना.तुपकर म्हणाले की, विदर्भात कापुस उत्पादनाला चालना देण्यासाठी त्याच प्रमाणे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी टेक्सटाईल कंपन्यांनी शेतकर्यांसोबत करार शेती करुन उच्च प्रतिचे बियाणे पुरवावे व त्यावर्षीचा उच्चांकी भाव द्यावा, तर कापुस उत्पादनालाही चालना मिळेल व शेतकर्यांच्या होत असलेल्या आत्महत्या काही प्रमाणात थांबवता येतीलत्र वस्त्रोद्योग व कापुस उत्पादक या एका नाण्याच्या दोन बाजु असून कापुस उत्पादक जगला तर वस्त्रोद्योग सुध्दा टिकेल. म्हणून कापुस उत्पादक शेतकरी टिकविण्यासाठी वस्त्रोद्योग कारखानदारांनी पुढे येण्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्रातही स्वस्त दरात वस्त्रोद्योगाला विज देण्याची मागणी आपण मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे रेटून धरणार आहोत असेही तुपकर म्हणाले. विदर्भ मराठवाड्यात आम्ही टेक्सटाईल पार्क उभे करणार आहोतच. त्याचबरोबर नागपूर व सोलापूर येथे भव्य असे गारमेंट पार्क ही उभारण्यात येतील अशी घोषणा ना.तुपकरांनी यावेळी नागपूरात केली. या परिषदेला देशभरातून मोठ्या संख्येने विविध टेक्सटाईल कंपन्यांचे पदाधिकारी व टुल्स मॅन्युफॅक्चरर उपस्थित होते.