पठाणकोट हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा - फ्रान्सचे राष्टपती फ्रांस्वा ओलांद यांचा पाकला सल्ला
चंदीगड, 24 - फ्रान्सचे राष्टपती फ्रांस्वा ओलांद यांनी भारताची बाजू घेतली आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत भारताने आवश्यक ते सर्व पुरावे पाकला सोपवले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानने त्यावर योग्य कारवाई करावी, असे ओलांद म्हणाले.
चंडीगडमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांचे आगमन झाले. त्याआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानला त्यांनी हा सल्ला दिला आहे. दरम्यान, चंडीगड विमातळावर ओलांद यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चंदीगडपासून ओलांद यांच्या भारत दौर्याची सुरूवात झाली आहे. रॉक गार्डन येथे मोदी आणि ओलांद यांची भेट होईल.