राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी आरक्षण सुरु ठेवले : सुमित्रा महाजन
नवी दिल्ली, 24 - स्वातंत्र्यांच्या 66 वर्षांनंतरही वर्षानंतरही आरक्षण प्रणाली सुरु राहणे, हा राजकीय पराभव आहे, असे महाजन म्हणाल्या. अहमदाबादमधील एका कार्यक्रमावेळी सु
मित्रा महाजन बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 10 वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. मागसवर्गीयांचे जीवनमान उंचावून त्यांना पुढे आणण्याची गरज होती. मात्र, आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी तसे काहीच केले नाही आणि स्वार्थासाठी आरक्षण सुरुच ठेवले, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. सुमित्रा महाजनांच्या आरक्षणावरील वक्तव्याविरोधात आरजेडीपासून काँग्रेसपर्यंत, सर्वच पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतो आहे. त्यामुळे आगामी काळात सुमित्रा महाजनांच्या आरक्षणावरील वक्तव्यावरुन राजकारण तापण्याचे चिन्हे आहेत.