Breaking News

शिवाजी अभियांत्रिकीत आयोजीत स्पर्धा परिक्षेला प्रचंड प्रतिसाद



परभणी, 13 - आजच्या स्पर्धेच्या युवकांचा सर्वांगिन विकास होणे गरजेचे आहे. त्यांना कठोर स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी तसेच प्रत्येक क्षेत्रात करिअरसाठी स्पर्धा परिक्षेस सामोरे जावे लागत आहे. म्हणुन आमचा प्रत्येक युवक स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे हा हेतु ठेवुन पहिल्यांदाच परभणी येथील म.शि.प्र.मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रीकी व एम.बी.ए. महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या 153 व्या जयंतीनिमीत्त विभागीय भव्य ‘टेक्नोक्वीज 2016’ स्पर्धा परिक्षेचे आयोजन दि. 10 रोजी करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. 
सदरील स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर व बीड या पाच जिल्ह्यातील चार हजारांच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही परिक्षा सामान्य ज्ञान, चालु घडामोडी व बुध्दीमत्ता चाचणी अभ्यास क्रमावर आधारीत 11 वी, 12वी विज्ञा6 व तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषीक 10 हजार रु. व स्मृतीचिन्ह, व्दितीय पारितोषीक 5 हजार रु व स्मृतीचिन्ह, तृतीय पारितोषीक 3 हजार व स्मृतीचिन्ह या तिन विजेत्यासह पुढील 151 विजेत्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषीक दिली जाणार आहेत. दुपारी 12.30 वा. परिक्षेला सुरूवात झाली. तब्बल 75 मिनीटांनी परिक्षा होती. या परिक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विविध जिल्ह्यातुन आल्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्तही करण्यात आला होता. परिक्षा संपल्यानंतर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. 
यावेळी परिक्षा संपल्यानंतर बालाजी बच्चेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिक्षेची पाहणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक सुधाकर जगताप, शिवाजी इंजिनअरींग, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य रणजीत काकडे, कॅम्पस् संचालक बालाजी बच्चेवार यांची उपस्थिती होती. परिक्षा सुरळीमत पार पाडण्यासाठी प्रा. जि.ए. कर्‍हाळे, प्रा. बि.बि. कदम यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद कर्मचारी वृंद व अभियांत्रिकीच्या विद्यार्थी यांनी सहकार्य केले.