अनैसर्गिक अत्याचार करणार्या नराधमास फाशी द्या
हिंगोली(प्रतिनिधी), 13 - चार वर्षीय चिमुकली अंगणात खेळत असतांना तिला चॉकलेटचे आमिष दाखवुन एका युवकाने अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा खून केल्याची घटना दि. 7 जानेवारी रोजी सकाळी वारंगा मसाई या गावात उघड झाली. या प्रकरणी आरोपी विरोधात आज दि. 12 जानेवारी रोजी पिडीत कुटुंबासह जवळपास पाच गावातील हजारो महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन या प्रकरणातील आरोपीस फाशी शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे दि. 7 जानेवारी रोजी वारंगा मसाई येथील सदरील मुलीचे वडील मजुरीसाठी बाहेरगावी गेलेला असतांना मुलीच्या पित्याला दुपारच्या सुमारास गावकर्यांनी फोन करुन सांगितले की, त्याची चार वर्षाची मोठी मुलगी ही घरातुन बेपत्ता आहे. माहिती कळताच पित्याने घर गाठुन मित्र व नातेवाईकासह मुलीचा शोध घेतला. यावेळी मुलीच्या आजीने दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या लहान्या बहीणीसह अंगणात खेळत असतांना शेजारी राहणार्या भागवत परबती क्षिरसागर व राहुल उर्फ सतिश मसाजी क्षिरसागर यांनी तिला दुकानातुन चॉकलेट घेऊन देतो म्हणुन घेऊन गेले. तेव्हापासुन सदर मुलगी घरी आली नाही. या माहितीवरुन मुलीच्या पित्याने कळमनुरी पोलिसांना संपर्क साधुन बोलाविले. पोलिस व गावकर्यांनी घराची तपासणी केली असता, भागवत क्षिरसागर याच्या घरामध्ये पांढर्या रंगाच्या पोत्यात सदर मुलीचा मृतदेह आढळुन आला. तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबलेला होता. तसेच कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्याने पाहणी केली असता, तिच्या दोन्ही गुप्तांगावर मोठ्या जखमा आढळुन आल्या. त्यानुसार भागवत क्षिरसागर याने तिच्यावर अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य देखील केल्याची तक्रार पित्याने दाखल केली आहे. तसेच हा प्रकार माहिती असतांनाही मुलीचा मृतदेह लपवुन त्याला सहकार्य केल्याप्रकरणी राहुल क्षिरसागर, परबती क्षिरसागर, पंचफुलाबाई क्षिरसागर, कवी नारायण क्षिरसागर, मसाजी क्षिरसागर, शोभा क्षिरसागर यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत्तदेह घरात लपवुन ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन मुख्य आरोपीसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या मोर्चात सकाळपासुनच नाईकनगरात पिडीत कुटुुंंबासह अनेक गावातील महिला व पुरुष हळहळु जमा होऊ लागले. हा मोर्चा जिल्ह्यात बलात्कार्याच्या विरोधात प्रथमच झाला असल्याचे अनेक मोर्चातील पुरुष व महिला म्हणत होते. या मोर्चात जवळपास 2 ते 3 हजार पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या.