जबर मारहाण करून हॉटेलचीही केली तोडफोड
बीड,दि.13 - नेकनर येथील नुराणी बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या लोकांनी हॉटेल चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत लोंखडी गजाने मारहाण केल्यानंतर हॉटेलमधून साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी चारजणांच्या विरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, सायंकाळी सातवाजण्याच्या दरम्यान नेकनुर येथील नुराणी बिर्याणी हॉटेल येथे आलेल्या काही जणांनी संगणमत करून हॉटेल मालकाला काठी लोखंडी गजाने जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी हॉटेल मालकाच्या वडीलांनाही सोडले नाही. त्यांना मारहाण झाल्यानंतर हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली यात सय्यद आदमअली अमजदअली, उस्मानअली, सय्यद सोहेल अली हे तिघेजण जखमी झाले, जखमींवर बीड येथील जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून नेकनुर पोलिस ठाण्यात कलम 307, 323, 504, 506, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.