ग्रामीण पत्रकार संघांच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद झाल्टे
मेहकर (प्रतिनिधी), 29 - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सकाळचे मेहकर तालुका बातमीदार विनोद झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष कुलथे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
जळगाव जामोद येथे प्रजासत्ताकदिनी ग्रामीण पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्ष कुलथे, विदर्भ अध्यक्ष कैलास देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संघटना वाढीच्या दृष्टीकोनातून बैठकीत चर्चा करण्यात आली. झाल्टे यांचे संघटन कौशल्य व अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनेला याचा निश्चीतच फायदा होईल, असा विश्वास कुलथे यांनी व्यक्त केला. उपाध्यक्षपदी डॉ.संतोष लाड, रमेश शिरसाट, जिल्हा सचिव हागे, जिल्हासंघटक दशरथ पनाड, वासुदेव राजनकर, मेहकर तालुकाध्यक्षपदी गणेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.