Breaking News

हिरकणीची ‘कस्तुरी कपडा बँक’ ही राज्यातील पहिली संकल्पना -आ.प्रणिती शिंदे

 बुलडाणा  । 29 - गुंतवणुक समाज सेवेची, प्राप्ती समाधानाची, अन् परतफेड सद्भावनेची. या उक्तीवर आधारीत गोरगरीबांची सेवा करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कस्तुरी कपडा बँकेची सुरूवात झाली आहे. 
ही संकल्पना राज्यातील सर्वोप्रथम संकल्पना असल्याचे मत सोलापूरच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मांडले. त्या हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीने आयोजित कस्तुरी कपडा बँकेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राहुलभाउ बोंद्रे तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विजुभाउ अंभोरे, जि.प.अध्यक्षा सौ. अल्काताई खंदारे, जि.प.बांधकाम सभापती अंकुशराव वाघ, युवक कॉगे्रस जिल्हाध्यक्ष मंनोज कायंदे, अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, चिखली पंचायत समितीच्या सभापती सौ.सत्यभामाताई डहाके, हिरकणी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे, तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, बाजार समितीचे सभापती विष्णु पाटील, सौ. मृणालीनीताई सपकाळ, समाधान सुपेकर, माजी नगराध्यक्षा प्रा.सौ. अरूणाताई कदम, सौ. शोभाताई सवडतकर, नगरसेविका सौ. करूणाताई बोंद्रे, सौ. उषाताई डुकरे, श्रीमती सुनिता शिंगणे, हे होते. 
यावेळी पुढे बोलतांना आ.प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, कस्तुरी कपडा बँकेच्या धर्तीवर संपुर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कपडा बँका उभारल्या गेल्या तर हया राज्यात कोणालाही कपडाविना राहण्याची गरज पडणार नाही. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या माध्यमातून महिलांना धिर देण्याचे, तसेच मानसिक आणी शारेरीक दृष्टया सक्षम करण्याचे काम करण्यात येत आहे. ही बाब महिलांसाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे. महिलांचे संघटन करणे ही काळाजी गरज आहे, महिलांना मातृत्वही वेगळी देणगी निर्सगाने दिली आहे, त्यामुळे महिला अधिशक्ती आहे. महिलांचा आदर्श म्हणून गौरव करणारा पुरूष हाच खरा पुरूष असतो. समाजात अनेक ठिकाणी श्रीमंत आणी गरीब ही दरी आपणास पहावयास मिळते, त्यामुळे एकीकडे हितभर कपडे आणी एकीकडे अंग झाकणे देखील मुश्कील असते. अशा परिस्थीतीत सामाजिक ़ण फेडण्याच्या उदांत हेतूणे प्ररित होवून आज ही कस्तुरी कपडा बँक सुरू झाली आहे. याला नागरीकांचे मोठया प्रमाणात सहकार्य लाभणार आहे यात कुठलीही शंका नाही. 
तर यावेळी आमदार राहूल बोंद्रे म्हणाले की, कुटूंब व्यवस्था ही गृहीणमुळेच टिकून असून घर दार आणी संस्कृती टिकविण्याचे काम मातृशक्ती करीत आहे. महिला शक्ती पुर्णपणे वापरात आली तर आपला देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कस्तुरी कपडा बँकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रामाणीक प्रयत्न करा असे सांगितले. 
जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांनी सदर उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण व हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती विषद करत, कस्तुरी कपडा बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या नाविण्यपुर्ण अशा उपक्रमातून यापुढे कोणीही गरजु वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली. 
कार्यक्रमाचे प्रास्तावीक सौ. गिता भोजवानी, आभार प्रदर्शन सौ. वंदना इंगळे तर संचलन सौ. उर्मिलाताई बावस्कर यांनी केले. यावेळी हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या विविध शाखाचे संचालक मंडळ व सल्लागार मंडळ यांच्यासह कॉगे्रस पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.