Breaking News

शासकीय योजना पासून फासे पारधी वंचित

 बुलडाणा  । 29 - आदिवासी फासेपारधी समाज बांधवांना सेवा सुविधा पासुन वंचित रहावे लागत आहे. रेशनकार्ड,जातीचा दाखला, दारिद्र रेषेखालचे प्रमाणपत्र आदि न मिळाल्यामुळे आदिवासी पारधी समाज शासकीय योजनेपासून वंचित आहे. म्हणून शासकीय दाखले मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी फासे पारधी संस्था मालठाणा तसेच आदिवासी मुलनिवासी मोर्चाचे प्रंशात सोनोने यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे एका निवेदनाद्धारे केली आहे.
फासे पारधी समाजातील लोक विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे रेशन कार्ड, जातीचे दाखले, घरकुले व दारिद्र रेषा कार्ड तसेंच इतर मागण्यासाठी 2008 पासून पाठपुरावा करीत आहोत. मागील 8 वर्षापासून फक्त पोकळ आश्‍वासनाशिवाय आमच्या पदरात काहीच पडलेले नाही. संदर्भ क्र.2 नुसार तत्कालीन उपविभागीय अधिकारी अमानकर जळगाव जामोद यांनी 4 डिसेंबर 2008 रोजी रेशन कार्ड व जातीच्या दाखला, दारिद्रय रेषेखालील कार्ड फासेपारधी लोकांना मिळण्यासाठी मालठाणा ता. संग्रामपूर येथे कॅम्प घेण्यात आला होता. परंतु आजपर्यंत रेशनकार्ड, जातीचा दाखला, दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. यावरून आमचया जमातीला विकासापासून दूर्लक्षीत करीत असल्याचे आम्हाला जाणवते. मुळातच आम्ही जंगलात, रानावनात राहतो कारण गावामध्ये आम्हाला लोक वसु देत नाही आणि जंगलात रानावनात आम्हाला घर मिळत नाही. शासकीय योजना आमच्यासाठी फक्त देखावा आहे. रेशन कार्ड, जातीचा दाखला नसल्याने कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ आम्हाला अतिक्रमण करून राहत असलेल्या महसुल व वनविभाग तसेच इतर ठिकाणी राहत असलेल्या जागेवर भाडेपट्ठा करून देण्याबाबत,फासे पारधी समाजातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे बाबत, आदिवासी प्रकल्प अकोला यांच्यामार्फत घरकूल, विविध प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योग व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देणे, आदिवासी विभागाच्या आजपर्यत जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात कुठलाही लाभ आम्हाला मिळाला नाही,  आदिवासींचे जमीन गैर आदिवासींनी हडपलेली आहे त्याचा निपटारा तात्काळ करणे, आदि मागण्या करण्यात आल्या असून निवेदनावर प्रशांत सोनुने, दिपु ठुबका पवार यांच्या सह्या आहेत