Breaking News

शत्रुलाही दुःखाची जाणीव करून द्या - मनोहर पर्रीकर


नवी दिल्ली, 11 - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी देशाच्या शत्रुंना इशारा देत म्हटले आहे, ’ज्यांनी 
आपल्याला इजा पोहोचवली आहे. त्यांना त्याचे भान तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्यांच्यासोबत तसे होत नाही.’ सोमवारी आर्मी डे सेलिब्रेशनमध्ये पर्रीकरांनी एक प्रकारे शत्रूला जशास तसे उत्तर देण्याचा हा इशारा मानला जात आहे. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी पठाणकोट हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
भारताचे जीवितहानी वा अन्य माध्यमांमधून नुकसान करणार्‍या व्यक्ती वा संघटनांना त्याच भाषेत उत्तर 
दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही, असे वक्तव्य संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी  केले. मात्र अशा स्वरुपाचे उत्तर हे कधी, कसे आणि कुठे‘ दिले जावे, याचा निर्णय आपल्याच हाती असावा, असे 
संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री हे लष्करामधील उच्चाधिकार्‍यांस संबोधित करत होते. लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग हे देखील यावेळी उपस्थित होते. देशाच्या हितास धक्का पोहचविणार्‍या व्यक्ती वा संघटनांना त्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही. इतिहासामधून हा बोध घेणे आवश्यक आहे. असे उत्तर कशा प्रकारे दिले जावे, याचा निर्णय आपला असावयास हवा. अर्थात हे माझे मत असून याचा अर्थ सरकारचे अधिकृत धोरण अशा स्वरुपाचा घेतला जाऊ नये,“ असे पर्रीकर म्हणाले.