Breaking News

तुरची मारामारीत रिव्हॉल्व्हर रोखले’
तासगांवः दि. 5 - तालुक्यातील तुरची येथे खासदार संजयकाका पाटील यांचा डिजीटल फलक लावण्यावरुन दोन गटांत वादावादी व मारामारी झाली. रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 
याप्रकरणी डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तसेच चोरी व आर्थिक नुकसानीची फिर्याद संतोष उत्तम पाटील (27) यांनी तासगांव पोलिसांत दिली आहे. दुसर्‍या गटानेही संतोष पाटील यांच्यासह दहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सचिन दत्तात्रय पाटील, सुहास सर्जेराव पाटील, अरविंद सर्जेराव पाटील, कुंडलिक पाटील, राजेंद्र सीताराम पाटील, शंकर पांडुरंग देवकते, देवदास विष्णू कदम, हणमंत तुळशीराम तांदळे, हर्षवर्धन संजय पाटील, योगेश बाळासाहेब सरगर (सर्व रा. तुरची) या व अन्य 25 जणांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पाटील हे तासगाव तालुक्याील तुरची येथे राहतात. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास संतोष व त्यांचे मित्र संजयकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा डिजीटल फलक लावत होते. यावेळी वरील 10 जणांसह इतर 20 ते 25 जण तेथे आले. यातील हणमंत तांदले व राजेंद्र पाटील यांनी संतोष यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले व खासदारांचे डिजिटल लावलेस तर उद्याचा दिवस तुला बघू देणार नाही, अशी धमकी दिली. 
तसेच त्यांच्यासोबत आलेल्या इतर लोकांनी तलवारीचा धाक दाखवत पाटील यांना खाली पाडून काठ्या व लाथा-बुक्क्यांनी 

बेदम मारहाण केली, त्याला सोडू नका, बोर्ड जाळून टाका, असे म्हणत फलकावर गाडी घालून मोडतोड केली.
या मारहाणीत संतोष यांची 56 हजारांची सोन्याची चेन हिसडा मारुन पळवली, तर फलकाचे 10 हजारांचे नुकसान 

झाल्याचीही तक्रार आहे. याप्रकरणी 25 जणांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यातील राजेंद्र पाटील, 

हणमंत तांदळे, अरविंद पाटील, सुहास पाटील, कुंडलिक पाटील हे वाळू तस्कर आहेत व त्यांची गावात प्रचंड दहशत आहे, 

असे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
दुसरीकडे विष्णू माने यांनी दिलेल्या फिर्यादीत, गावातील जुना राजकीय वाद उकरुन काढत विरोधी गटाने काठ्या, तलवारीचा 

धाक दाखवीत मारहाण केली. संतोष पाटील, विनायक पाटील, उत्तम पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, विलास पाटील, 

कुबेर पाटील, श्रीकांत खरात, तानाजी ढेेबे, हरिदास तांदले आदी 10 जणांनी मारहाण केल्याचे म्हंटले आहे.