Breaking News

बॉम्बच्या भितीने विमानाचे लँडिंग

नागपूर : बॉम्ब असल्याच्या भितीने मुंबईकडे जात असलेले गो एअर कंपनीचे विमान नागपूर विमानतळावर उतरविण्यात आले. तपासणीनंतर ही बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. बॉम्बच्या अफवेमुळे भुवनेश्‍वर-मुंबई विमान नागपूरला उतरवले. भुवनेश्‍वरहून विमानाने मुंबईकडे उड्डाण घेतल्यानंतर विमानात काही संशयास्पद वस्तू आढळून आली. याबाबतची माहिती प्रशासनाकडे देण्यात आल्यानंतर नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात  आ
ले.