Breaking News

पंतप्रधान मोदींनी केल्या नेताजी बोस यांच्या फायली सार्वजनिक

नवी दिल्ली, 23 - स्वतंत्र भारतातले सर्वात मोठे गुपित आता उघड होणे शक्य आहे. आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 100 गोपनीय फाईल्स मोदी सरकारने आज सार्वजनिक केल्या. सुभाषबाबूंच्या 119व्या जयंतीनिमित्त सरकारने हे पाऊल उचलले. या व्यतिरिक्त दर महिन्याला 25 फाईल्स जाहीर केल्या जाणार आहेत. पशींरक्षळषळश्रशी.र्सेीं.ळप या वेबसाईटवर या फाईल्स बघता येतील.  यामुळे नेताजींच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलू उघड होतील. मागील अनेक दिवसांपासून या फायली उघड केल्या जाव्यात अशी मागणी केली जात होती. यामध्ये सर्वसामान्य देशवासीयांप्रमाणेच संशोधकांचाही समावेश आहे. भारताचे राष्ट्रीय संग्रहालय दरमहा या फायलींच्या 25 डिजिटल प्रती प्रसिद्ध करणार आहे. या कार्यक्रमाला नेताजींच्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. वर्षी आक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी त्यांनी गोपनीय फायली लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे आश्‍वासनही दिले होते. 
त्यानंतर तातडीने पंतप्रधान कार्यालयाने 33 फायलींचा संग्रह प्रसिद्ध करत तो 4 डिसेंबर 2015 रोजी भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडे सुपूर्तही केला होता. त्यानंतर तातडीने गृहमंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या फायली प्रसिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. काही किरकोळ प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय संग्रहालय नेताजींशी संबंधित शंभर फायली प्रसिद्ध करेल,
असे सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केले होते.