Breaking News

उद्योजकाचा दगडाने ठेचून खून

माधवनगर (ता. मिरज), 31 -  येथील उद्योजक भास्कर सिद्राम होसमणी वय 52, रा. गणपती मंदिराजवळ, शनिवार पेठ) यांचा लाकडी बॅटने व दगडाने ठेचून खून करण्यात आला. इनाम धामणी ते सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ रात्री दहा वाजता ही घटना घडली. 
घटनास्थळी बॅट, मिरची फूड व विनाक्रमांकाची बुलेट मोटारसायकल सापडली आहे. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.भास्कर होसमणी यांचा इंजिनिअरींगचा व्यवसाय असून, येथील वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील साखर कारखान्याच्या गेट क्रमांक दोनसमोर वर्कशा
ॅप आहे. या वर्कशॉपमधून विविध उद्योगांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. होसमणी माधवनगर येथील शनिवार पेठेत मोठे बंधू भालचंद्र होसमणी यांच्यासह राहतात. ते दररोज सायंकाळी वसंतदादा साखर कारखाना ते सूतगिरणीपर्यंत फिरायला जात. सायंकाळी के फिरायला गेले होते. त्यानंतर ते माधवनगरमध्ये आले होते. सायंकाळी बाहेर जेवायला जाणार आहे, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. रात्री दहा वाजता सांगली ग्रामीण पोलिसांना एकाने दूरध्वनीवरुन इनाम धामणी ते सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरिक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी मृतदेहाशेजारी एक लाकडी बॅट, रक्ताने माखलेला दगड, मिरची पूड असलेला पुडा व बुलटे मोटारसायक
ल आढळून आली. मृतदेहाच्या चेहर्‍याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. शरीरावर अन्यत्र कोठेही जखम नव्हती. होसमणी अविवाहित होते. त्यांना दागिन्यांची हौस होती. 
खिशातील ओळखपत्रावरुन त्यांची ओळख पटली. मृतदेह त्वरीत शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. भास्कर होसमणी यांचा खून झाल्याचे वृत्त पसरताच घटनास्थळी व सांगलीच्या शासकीय रुग्णालयात व्यापारी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. होसमणी यांचा खून कशासाठी झाला, याबद्दल उलटसुलट चर्चा सुुरु आहे. घटनास्थळी सांगली ग्रामीण  संजयनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.