पाणीपट्टी वाढीचा विषय स्थायीत गाजणार
अहमदनगर । प्रतिनिधी । 10 - महानगरपालिका स्थायी समितीची सभा गुरुवार दि.14 रोजी दु. 1 वा. मनपाच्या नवीन शासकीय इमारतीच्या स्थायीच्या सभागृहात होणार आहे. सभेत महापालिकेच्या 2015-16 या वितीय वर्षात पुर्वनियोजन अंदाजपत्रकास मंजूर मिळविण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. आरोग्य सुविधा निशुल्क करणे,पाणीपट्टी दुप्पट करण्यास मंजूरी, रक्तपेढीसाठी कर्मचारी नेमण्याबाबत आदी विषय स्थायीत ठेवण्यात आले असले तरी पाणीपट्टी दुप्पटीचा विषय सभेत गाजणार आहे.
फिरता दवाखानामार्फत पुरविण्यात येणार्या आरोग्य सुविधा निशुल्क करणे, याआर्थिक वर्षाकरिता जंतूनाशक द्रव्य व पावडर आदी पुरवठा खरेदीकामी मागविण्यात आलेल्या कमीची निविदा मंजूरी मिळणे, मनपाच्यावतीने मनपाच्यावतीने पॅनलशिपवर कायदेशीर सल्लागार यांच्या ऑफिस रिपोर्टवर चर्चा करुन मंजूरी मिळण्याबाबत, कचरा वाहतुक करण्याकरिता कॉम्पॅक्टर खरेदी कामी तसेच या अनुषंगाने लोखंडी कंटेनर 50 नग खरेदी करणे व खर्चाबाबत ऑफिस रिपोर्ट, बंद केलेले नळ कनेक्शन असतांना आकारण्यात आलेल्या पाणीपट्टी रक्कम निर्लेखिती करण्यास मंजूरी मिळण्याबाबत आदी विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे. मनपा अधिकारी व पदाधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी वाहन कराराने लावण्याकामी मंजूरी देणे, बाळासाहेब देशपांडे दवाखाना अत्यावश्यक सेवेसाठी तात्पुरत्या स्वरुपात करारानुसार स्त्री रोगतज्ञ म्हणून डॉ.अमोल जाधव यांची तांत्रिक खंड देऊन अटी व शर्तीप्रमाणे 6 महिन्यासाठी मानधनावर करार करणे रक्तपेढी विभाग अत्यावश्यक सेवेसाठी करारानुसार तात्पुरत्या स्वरुपात जनसंपर्क अधिकारी स्टाफनर्स, या पदावर तांत्रिक खंड देऊन 6 महिन्यासाठी मानधनावर नियुक्ती देण्याबाबत आदी विषय चर्चिले जाणार आहे. पाणीपट्टी दुप्पटीने वाढ करण्याच्या विषयावर स्थायीची सभा वादग्रस्त होऊन स्थगित होण्याची शक्यता आहे.