वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक-ननावरे
बीड,दि.13 - रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच जिवितहानी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी व्यक्त केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 जानेवारी ते 24 जानेवारी 2016 या कालावधीत आयोजित 27 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान-2016 च्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना नामदेव ननावरे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अपर पोलीस अधिक्षक मारूता कराडे, औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी ए.ए.खान, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे, वाहतुक नियंत्रणन शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मजदर सय्यद यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे म्हणाले की, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम व कायदे पाळण्याबरोबरच वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे केल्याने रहदारीमध्ये काही प्रमाणात घट होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. अपघात झाल्यानंतर नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता अपघातग्रस्तास मदत केली पाहिजे. त्यांना लवकरात लवकरात आरोग्याची सुविधा मिळण्यासाठी शासनाने रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली असून याचा उपयोग नागरिकांनी केला पाहिजे. व 108 क्रमांकावर तातडीने फोन करून रूग्णवाहीेतून अपघात ग्रस्तांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यास त्यांचे प्राण वाचण्यास निश्चित मदत होईल असेही ते या वेळी सांगितले.
यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, बेदकारपणे वाहन चालवून आपले व इतरांचे प्राण धोक्यात न घालता नागरिकांनी वाहनाचा वेग, शिस्त याला महत्व द्यावे. तसेच वाहतुकीच्या नियम कायदाबाबत विविध उपक्रमांद्वारे जनतेमध्ये प्रबोधन करावे असेह ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, रस्त्यावरील अपघातामध्ये जखमी अथवा मृत्युमुखी पडणार्यामध्ये जास्तीत जास्त 15 ते 30 वयोगटांतील तरूण असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वयोगटातील तरूणांना वाहनांच्या नियमाचे व कायद्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे असून वाहनाच्या वेगावर कसे नियंत्रण ठेवावे यावरही प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपविभागीय अधिकारी गणेश गावडे म्हणाले की, वाहनधारकांनी वाहनाच्या आवश्यक आहे. वाहन योग्य ठिकाणी पार्किंगकरून त्या वाहनास लॉक केल्यास वाहनाची होणारी चोरी टाळता येऊ शकते असे ही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक मारूती कराडे ओलताना म्हणाले की, रस्ता सुरक्षेबाबत जनतेमध्ये जनजागृी होण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियांना अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांनी दि.10 ते 24 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानमध्ये घेण्यात येणार्या कार्यक्रमाची माहिती देऊन या कालावधीतमध्ये वाहतुकीचे कायद्याची जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यात पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, शाळा, कॉलेजमध्ये वाहतुक विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासरखे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलेप्रारंभी दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 27 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान 2016 निमित्त तयार करण्यात आलेल्या माहितीपुस्तीका, स्टिकर्स, माहिती पत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व रस्ता सुरक्षाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी बलभिम विद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच माहितीपर माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश देशमुख यांनी केले तर आभार मजदर सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीच्क अर्जुन गुजर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राघवेंद्र पाटील, अमित मुंडे, अमोल आव्हाड यांच्यासह सर्व संबंधति विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.