वीज मिटर तपासणी मोहिमेत लाखों रुपयांची जमवली माया; ग्राहकांना शॉक
गंगाखेड, दि.08 - शहरातील वीज ग्राहकांचा मीटर तपासणीच्या नावाखाली महावितरण टिम वीज चोरी करणार्यांवर कोणतेही कार्यवाही न करता तडजोडीच्या माध्यमातुन लाखो रुपयाची माया जमवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. या मध्ये वीज महावितरणचे बडे माशे पण सहभागी आहेत.
वीज वितरण कंपनीने शहरातील मीटर तपासणी मोहिम हाती घेतली यामध्ये निवडक कर्मचार्यांची टिम करण्यात आली. डिसेंबर 2015 मध्ये शहरातील दिलकश चौक, वकिल कॉलनी, ओम नगर, व्यंकटेश नगर, प्राध्यापक कॉलनी सह अनेक भागातील केलेल्या मीटर तपासणी मध्ये वीज चोरीचे प्रमाण आढळुन आले. मीटरमध्ये डायोड, रजिट्रन्स, टायपींग सिटी कंन्ट्रोल लुप असे प्रकार आढळुन आले तर अनेक ग्राहकांकडे मीटर रिमोट असल्याचे आढळले पण मीटर तपासणी टिमने केवळ नामधारी पंचनामा करण्यात आला. वीजचोरी करणार्या ग्राहकांसोबत आर्थिक तडजोडी करण्यात आल्याचा प्रकारामध्ये आर्थिक तडजोडीचा मोबदला वरिष्ठापयर्ंंत द्यावा लागत असल्याचे ग्राहकांना सांगण्यात आले. पुढील कार्यवाही
टाळण्यासाठी अनेकांनी आर्थिक तडजोडी सदरील प्रकाराबाबत विज वितरणचा एका कर्मचार्यांनी लाखो रुपयामध्ये टक्केवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आर्थिक तडजोडी करणणार्या वीज ग्राहकांना वीज चोरी करण्यास एक प्रकारे प्रोत्साहन दिले पण तडजोडी न करणार्यांना वीज बिलामध्ये दंड आकारण्यात आला आहे. जमवलेला लाखो रुपयांमध्ये महावितरणचे कोणते अधिकारी गुंतले आहेत हे लवकरच उघडे होईल. मिटर तपासणी मोहिमेत आजी, माजी विज कर्मचारी यांचा मीटरची तपासणी न करता त्यांना यातुन वगळण्यात आले.