Breaking News

वक्तृत्व शैलीतुन आत्मविश्‍वास वाढतो - बच्चेवार

परभणी, दि.08 - वक्तृत्व शैलीतुन आत्मविश्‍वास वाढतो त्यामुळे वक्तृत्वकलेचा छंद जोपासुन कौशल्यास महत्व दिले पाहिजे कारण आज देशातच नव्हे तर जगामध्ये सर्व क्षेत्रात संभाषणास महत्व आहे. म्हणुन आज जागतिकरणाच्या व खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आत्मविश्‍वास वाढविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य बालाजी बच्चेवार यांनी शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ बक्षिस वितरणा प्रसंगी केले. 
मराठवाड्याचा युवावक्ता वक्तृत्व स्पर्धेच्या परभणी जिल्हास्तरीय फेरीत ज्ञानोपासक अध्यापक विद्यालयाच्या कु. अंजना नाईक, सेलु येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या कु. प्रियंका डंबाळे, शिवाजी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पंकज भोसले यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषीके पटकावली. श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. सतिश चव्हाण यांच्यातर्फे मंगळवार दि. 5 रोजी स्पर्धा झाली. यावेळी बक्षिस वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाळासाहेब जाधव, प्रमुख पाहुणे प्राचार्य बालाजी बच्चेवार, तसेच इंजि. नारायण चौधरी, स्पर्धा जिल्हा समन्वयक रणजित काकडे, प्रा. सुरेश हिवाळे, प्रा. सुरेश कदम, यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन व 
आभार प्रा.डॉ. जयंत बोबडे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप चव्हाण, प्रा. नसरीन फातेमा, दिगांबर मुळे, सिद्दीकी, संजय गारकर, विष्णु बोंबले, विलास वाघमारे यांनी अथक परिश्रम घेतले.