Breaking News

दया नायक पुन्हा मुंबई पोलिस दलात


मुंबई, 12 -दलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यामुळे सेवेतून निलंबित करण्यात आलेले चकमकफेम पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. यापुढे त्यांची मुंबई पोलिस दलात नियुक्ती होणार असल्याचे समजते. 
पोलिस दलातील 1995 च्या तुकडीतील अधिकारी असलेले दया नायक यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी 2006 मध्ये अटक झाल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. साडेसहा वर्षांनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्यावरील गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा आरोप सिद्ध करता आला नव्हता. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कायद्याखाली केलेली कारवाई रद्दबातल ठरवली होती. 2012 मध्ये ते पुन्हा पोलिस सेवेत दाखल झाले होते. काही दिवस स्थानिक सशस्त्र विभागात नोकरी केल्यानंतर त्यांची पश्‍चिम प्रादेशिक विभागात नेमणूक झाली होती. त्यांना पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या पथकात घेण्यात आले होते. नंतर त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली होती; मात्र ते तिथे रुजू झाले नाहीत. जुलै 2015 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते.