विमानतळावर 3 तास आधी पोहोचा - एअर इंडियाचीे विनंती
नवी दिल्ली, 12 - पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यानंतर देशभरातील विमानतळांवरी सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. एअर इंडियाने सुरक्षेच्या कारणास्तव एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चेकिंगसाठी 3 तास आधीच प्रवाशांनी विमातळावर हजर राहण्याची विनंती एअर इंडियाने केली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासासाठी 75 मिनिटे आधी विमानतळावर पोहोचणे आवश्यक असते. मात्र, आंतररा
ष्ट्री
प्रवासासाठी ही वेळ 150 मिनिटे होती. मात्र, आता प्रवाशांना तीन तास आधीच विमानतळावर पोहोचावे
लागणार आहे. एका पत्रकाद्वारे एअर इंडियाने प्रवाशांना हे आवाहन केले आहे. एअर इंडिया वगळता अन्य कोणत्याही विमान कंपनीने अद्याप तरी असे आवाहन केलेले नाही. पठाणकोट हवाईतळावरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांची आणि प्रवशांच्या सामानांची तपासणी केली जाते आहे.