Breaking News

अभिनेत्री असीन विवाहबंधनात

मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी मंगळवारी बॉलीवूड अभिनेत्री असिन विवाहबद्ध झाली. मंगळवारी सकाळी चर्चमध्ये ख्रिश्‍चन पद्धतीने असिन आणि राहुल यांनी विवाह केल्यानंतर आज संध्याकाळीच हे दोघे हिंदू पद्धतीनेही विवाह करणार आहेत. या विवाहाला या दोघांचा जवळचा मित्र अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावण्याची शक्यता असून अक्षय कुमारच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी असिन आणि राहुल यांची एकमेकांशी ओळख झाली होती. दरम्यान, आज संध्याकाळच्या विवाह विधीसाठी असीन सब्यसाचीने डिझाईन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.