Breaking News

चंद्रपॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

बार्बाडोस : वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
चंद्रपॉलने आपल्या 22 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 164 कसोटी आणि 268 एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. तो वेस्ट इंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 11,867 धावा केल्या आहेत. तर, ब्रायन लाराच्या 11,953 धावा आहेत.