Breaking News

माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे निधन


नाशिक : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव सोनुजी आहेर आज मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. डॉ. दौलतराव आहेर यांच्यावर देवळा येथे आज सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
माजी आरोग्य मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी वसंतदादा साखर कारखाना सुरु व्हावा असा आग्रह धरला होता. अनेक वर्षे विठेवाडीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची धुरा सांभाळली. आहेर यांनी आमदारकीपासून खासदार, मंत्री, तापी खोरे महामंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली.