हिंदुत्ववादी विचारसरणीमुळेच रोहितची आत्महत्या -- कुलगुरु, मंत्र्यांवर कारवाई करण्याची खा.राहुल गांधींची मागणी
हैदराबाद/वृत्तसंस्था । 20 - विद्यापीठामध्ये विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी येतात,इथे आपले विचार, नव्या कल्पना मांडण्याचे स्वातंत्र असले पाहिजे. परंतू काही विद्यापीठामध्ये हिदूंत्ववादी विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत असल्यामुळेच हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने आत्महत्या करावी लागली,याला जवाबदार असणार्या कुलगूरू व मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी काँगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर विद्यापीठात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी हैदराबाद विद्यापीठात आले होते.रोहितने आत्महत्या केली हे खर असले तरी, त्याने आत्महत्या करावी अशी स्थिती विद्यापीठाचे कुलगुरु आणि मंत्र्याने निर्माण केली. मंत्री आणि मंत्रालय निष्पक्ष नव्हते असा आरोप राहुल यांनी केला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता रोखण्याचा हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून प्रयत्न केला गेला. रोहित वेलगूला आत्महत्या करण्यासाठी वातावरण तयार करण्यात आले. याला कुलगुरु आणि मंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी म्हणाले, हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरुंना हटविले पाहिजे, यात काही शंकाच नाही. कुलगुरुंना एकदाही रोहितच्या कुटुंबियांची भेट घ्यावी, असे वाटले नाही. विद्यार्थ्यांचा याठिकाणी आवाज चिरडला जात आहे.आम्ही या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, या
आत्महत्येमागे राजकारण असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मंत्र्यांनी याठिकाणी राजकारण केल्याचे दिसत आहे. एक विचारसरणी लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी कायदा करण्याची गरज आहे. या घटनेला जे कोणी जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. रोहितच्या आत्महत्येनंतर देशातील प्रत्येक विद्यापीठ त्याला न्याय देण्यासाठी लढेल. मी कोणताही भेदभाव न करता कायम विद्यार्थ्यांच्या मदतीस तयार आहे. याप्रकरणी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडारू यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव पोडिले, अखिल भारतीय विद्यार्थी प
रिषदेचा कार्यकर्ता सुशील कुमार व त्याच्या भाऊ कृष्णा चैतन्य याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडारू दत्तात्रेय यांनी या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांना पत्र लिहिले होते. याच पत्रामुळे रोहित व त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. रोहितने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. मात्र, त्यामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विद्यापीठाने केलेल्या कारवाईपासून रोहित उघड्यावर झोपत होता. त्याला प्रचंड नैराश्य आले होते, असे त्याचे मित्र सांगत आहेत.
दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी मोदींनी माफी मागावी
ही लोकशाही, सामाजिक न्यायाची व समतेची हत्या : केजरीवाल
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे सांगत केजरीवाल यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार मोदी सरकार दलितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र, त्याऐवजी मोदी सरकारमधील मंत्र्यांनी पाच दलित विद्यार्थ्यांना बहिष्कृत आणि निलंबित केल्याचे केजरीवाल यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. ही आत्महत्या नाही. ही हत्या आहे. ही लोकशाही, सामाजिक न्याय आणि समतेची हत्या आहे. त्यामुळे मोदींनी या मंत्र्यांची हकालपट्टी करून देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. रोहितला अन्य चार विद्यार्थ्यांसह ऑगस्ट महिन्यात विद्यापीठाकडून निलंबित करण्यात आले होते.
