Breaking News

तुमचा लाल दिवा काढायला दहा दिवस लागणार नाही :: महादेव जानकर

कॉग्रेस राष्ट्रवादी भोगी तर आम्ही त्यागी आहेत. आमच्या जिवावर आमदाराकी घेतली त्यांनी आम्हाला सत्तेची भाषा शिकवू नये तुमचा लाल दिवा काढायला दहा दिवस लागणार नाही असा सज्जड दम राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांचे नाव न घेता लावला.

               
 शहरातील बाजारतळ या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची काल दि 4 रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब नाहटा,प्रदेश सरचिटणीस बी जी कोल्हे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ शिवाजी शेंडगे, नगर जिल्हाध्यक्ष डी आर शेंडगे, पक्ष निरीक्षक शहाजी करडकर, बाळासाहेब दोडतले, शहाजी कोलटकर, जे डी शहा उज्ज्वला ताई हाके, तालुकाध्यक्ष विकास मासाळ ,गणेश सूळ ,बाबासाहेब चंदन, रमेश भोगे, प्रकाश गावडे ,सचिन मासाळ ,कोंडीराम मदने,संजय खरात ,अॅड कारंडे ,संगीता पवार यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
                 यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले की जामखेड तालुकाच नात हे आई आणि मुलाच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म जामखेड येथील चोंडी येथुन झाला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रा स पा चा सिंहाचा वाटा आहे. अघाडी सरकारने आम्हाला सत्तेची भाषा शिकवू नये मी मंत्री पद मागत नसुन मंत्री पद देण्याची ताकद आहे. आमच्या मुळे कमळ उमजले आहे त्याला ला कोमेजून टाळण्याची ताकद आहे. ज्यांना मी सत्तेत बसवले आहे त्यांना घरी लावण्याची ताकद आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बरोबर युती करून मुख्यमंत्री शिवसेनेचा तर उपमुख्यमंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचा असणार आसे जाहीर भाकीत केले. नेता तो नेता आसतो कार्यकर्ता तो कार्यकर्ता आसतो त्या मुळे मंत्र्यांनी आपल्या हिशोबाने वागावे असा सल्ला देखील पालकमंत्री यांचे नाव न घेता दिला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे आसते तर मी आज केंद्रात  मंत्री आसतो . पालक मंत्री प्रा राम शिंदे यांनी निष्ठावंतानां डावलून अवैद्य धंदे करणार्यांना उमेदवारी दिली आहे. 
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब नाहटा म्हणाले की रा स प पक्ष हा विनापैशाचे राजकारण करणारा पक्ष आहे. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे तीच परिस्थिती तालुक्यात आहे. मला जर सात खाती असती तर मी जामखेड चा चेहरा मोहरा बदलुन टाकला असता असे ते म्हणाले.