Breaking News

ब्राह्मणी संस्कृतीची नाळ हिंदु बहुजनांशी जोडू नका...


णे येथे शिवशक्ती संगम मेळावा घेवून आरएसएसने पुन्हा आपले दुटप्पी धोरण निदर्शनास आणून दिले आहे. पुणे येथेच 1848 मध्ये मुलींच्या शिक्षणाची शाळा आणि बहुजन समाजाला शिक्षणाची प्रवेशद्वारे खुली करुन देणारे फुले दांपत्यापैकी सावित्रीमाई फुलेंचा जन्म दिवस देशभरात साजरा होत असतांना संघाने त्या दिवसाला दिलेले वळण हे बहुजन इतिहास व्यक्तीमत्त्वांच्या संकोचाचा पाया असल्याचे दिसते. शिवसंगम मेळावा हा नेमक्या कोणत्या शिवाला शरण जाण्याचा मेळावा आहे या विषयीदेखिल संघाचे धोरण निश्‍चित नाही. शिवसंगम मेळावा याचा अर्थ हिंदु बहुजन शिवाजी महाराजांना नमन करणारा हा मेळावा असावा असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात संघामध्ये असणार्‍या ब्राह्मण स्वयंसेवकांचा तो केवळ उदात्तीकरणाचा सोहळा होता. कारण छत्रपति शिवाजी महाराज यांच्याविषयी संघाला किंवा ब्राह्मणांना कोणताही लळा वाटत नाही. छत्रपति शिवाजी महाराजांचे नाव घेत केवळ हिंदु बहुजनांना आकर्षण निर्माण करण्यासाठी घेत असतात. प्रत्यक्षात मात्र शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास उभा करण्यापासुन तर परधर्मीयद्वेष्ट्ये ठरविण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ज्या शिवाजी महाराजांनी हिंदु बहुजन समाजाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा राज्य कारभार चालवून नवा आदर्श घालून दिला. त्याच शिवाजी महाराजांच्या प्रदेशात आणि भूमित नंतरच्या काळात उदयास आलेल्या ब्राह्मणी पेशव्यांनी हिंदु बहुजनांचा छळच केला. इतकेच नव्हे तर छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेन कायम बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय हा इतिहास दडपून टाकण्याचीही त्यांची मजल पुढे गेली. आतातर वाचाळशाहीर असणार्‍या पुरंदरेंच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास पुढे रेटण्याचा त्यांनी कसोसीने प्रयत्न केला. हेच पुरंदरे संघाच्या शिवसंगम मेळाव्यात काळी टोपी घालून मंचावर वावरत होते. म्हणजे पुरंदरे हे शिवशाहीर म्हणून मंचावर होते की संघाचे कार्यकर्ते म्हणून? याचा सर्वसामान्य हिंदु बहुजनांना उलगडा झालेला नाही. अर्थात पुण्यात संघाचे दिडलाख कार्यकर्ते जमल्याचा खुप प्रचार केला गेला परंतु त्याच पुण्यापासुन अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर पेशवाईचा पराभव करणार्‍या भिमा कोरेगाव येथे चारलाखांचा मेळावा झाला होता. परंतु याची प्रसार माध्यमांनी साधी दखल घेतली नाही. जर गर्दीचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या बातम्या मिडीयाला निस्पृहपणे प्रसिध्द करायच्या होत्या तर भिमा कोरेगावच्या 1 जानेवारीच्या शौर्यदिना निमित्त जमलेल्या लोकांची दखल प्रसार माध्यमांना घ्यावीशी का वाटली नाही? ज्या ठिकाणी चारलाख लोक जमले असतील तेथील व्यापाराची उलाढाल किती प्रमाणात झाली असेल याची आकडेवारी येत नाही. परंतु शिवसंगम मेळाव्यात पाण्याच्या बॉटल्स किती संपल्या यावर गिनिज बुकाची नोंद होते. याचाच अर्थ संघाच्या या मेळाव्याला धनदांडग्या व्यापार्‍यांचा आणि उद्योगपतींचा पैसा मोकळ्या हातांनी ओतला गेला आणि म्हणून पुण्यातील मेळावा हा खर्‍या अर्थाने केवळ ब्राह्मण जातीचा जमाव एवढ्याच मर्यादित अर्थाने पाहावा लागेल. हिंदु बहुजनांचा त्या मेळाव्याचा काहीही संबंध नाही. हिंदु आणि ब्राह्मण हे पूर्णपणे वेगळे असुन आरएसएसने ब्राह्मणांना हिंदु संबोधण्याचा प्रयत्न करु नये आणि हिंदुंना ब्राह्मणी संस्कृतीचा पाईक बनविण्याचाही प्रयत्न करु नये. कारण हिंदु बहुजन यांची संस्कृती स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची संस्कृती आहे. ही संस्कृती हजारो वर्षांपासुन त्यांनी जोपासली आहे. याउलट ब्राह्मणांनी ब्राह्मणी संस्कृतीने या मुल्यांना कायम पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्या-ज्या वेळी त्यांच्या हातात राजकीय सत्तेचा अंकुश आला आहे त्या-त्या वेळी
ब्राह्मणी संस्कृतीने उन्मादच केला आहे. त्यामुळे अशा संस्कृतीशी हिंदुंची नाळ जोडू नये.