Breaking News

भारताने टी 20 मालिका जिंकली

मेलबर्न, 29 -  ऑस्ट्रेलियाचा दुसर्‍या टी 20 सामन्यात पराभव करत भारताने तीन सामन्यांची ही मालिका जिंकली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेल्या 185 धावांचे आव्हान करताना सुरुवातीच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर कांगारुंचा संघ पुन्हा पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला. भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारताला विजय मिळवून दिला.
अ‍ॅरॉन फिंचने तडाखेबाज फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 27 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. पण 10 व्या षटकात मार्शला 23 धावांवर बाद केल्यानंतर भारताने लिनलाही लगेचच बाद झाला. त्यानंतर आलेल्या हिटर ग्लेन मॅक्सवेलही आल्या पावली परतला. वॅटसन, फिंच आणि फॉकनरही त्याच्या मागे लगेचच पॅव्हेलियनमध्ये परतले. अश्‍विन, युवराज आणि हार्दिक पांड्या तिघांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. तर जडेजाचे दोघांना बाद केले. फिंच रनआऊट झाला. त्याआधी भारताच्या रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी सुरुवातीला सावध खेळ केला. त्यानंतर फटकेबाजी करत भरपूर धावा कुटल्या. दहा षटकांत टीम इंडियाने 84 धावा केल्या. मात्र फटकेबाजी करताना धवन 42 धावांवर बाद झाला. मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर लिनने धवनचा झेल घेतला. 
रोहित शर्माने मात्र फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. धवन बाद झाल्यानंतर आलेल्या कोहलीनेही मैदानावर उतरताच त्याच्या शैलीत फटकेबाजी सुरू केली. त्याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. धोनी 14 धावांवर बाद झाला. धोनीच्या नेतृत्वात खेळणार्‍या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 37
धावांनी विजय मिळवला होता.