Breaking News

गुरूरोहीदास महाराज यांच्या जयंती निमीत्त बैठक

बीड,दि.13 - चर्मकार समाजाचे आराध्य दैवत गुरू रोहीदास महाराज यांची 639 वी जयंती दि.22 फेब्रुवारी रोजी आहे. या निमित्ताने बीड शहरातील सर्व समाज बांधवांनी समाजातील संघटना व राजकीय हेवेदावे सोडून या बैठकीला हजर रहावे तसेच चर्मकार समाजावर होणारे अन्याय व अत्याचार या विषयावर सुद्धा चर्चा व विचार करावयाची आहे. सार्वजनिक जयंती आपल्याला मोठ्या प्रमाणावर साजरी कारवयाची आहे.
                      तसेच गुरू रोहीदास महाराज यांच्या जयंती निमित्त जयंती कार्यकारणी करावयाची आहे. याच दिवशी शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे महामंडळ निधी जास्तीचा देण्यात यावा अशा महत्वाच्या विषयावर चर्चा करावयाची आहे. यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या बैठकीस उपस्थित रहावे तसेच बीड शहरात संत रोहीदास महाराजांच्या पुतळ्या विषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. बैठक दिनांक 13 जानेवारी 2016 आज रोजी सकाळी ठिक 11 वा. आंबेडकर भवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.