जेवणानंतर या पाच गोष्टी करु नका
अनेकांना जेवण झाल्यावर झोपणे, आंघोळ करणे, चहा पिण्याच्या सवयी असतात. मात्र याच सवयी तुमच्या शरीरासाठी धोकादायक
असतात. या आहेत पाच गोष्टी ज्या जेवण झाल्यानंतर कधीही करु नका
* दुपारच्या जेवणानंतर काहींना झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी चांगली नाही. पोटभरुन जेवल्यानंतर लगेचच झोपल्यास
त्या जेवणाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे जेवणानंतर झोपू नये.
* जेवणानंतर अनेकदा पुरुषांना स्मोक करण्याची सवय असते मात्र ही सवय लगेचच सोडून द्या. जेवणानंतर सिगारेट पिणे म्हणजे 10 सिगारेट
पिण्यासारखे आहे.
* जेवणानंतर कधीही लगेचच आंघोळ करु नका. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही.
* प्रत्येक फळाचा पचनक्रियेचा कालावधी वेगवेगळा असतो. शक्यतो जेवणाआधी एक तास अथवा जेवणानंतर दोन तासांनी फळ खाणे चांगले.
* जेवणानंतर चहा प्यायल्याने अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे किमान जेवणानंतर एक ते दोन तास तरी चहा पिऊ नये.