विलायची खाल्ल्यास मजबूत बनते शरीर
विलायची एक सुगंधित मसाला आहे. खाद्यपदार्थांचा गंध वाढवण्यात विलायची महत्त्वाची भूमिका बजावते. गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी विलायची उपयोगात आणली जाते. विलायचीमध्ये आयर्न आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ’सी’ तसेच नियासिन हे तत्व आढळून येतात. लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी विलायची उपयुक्त आहे. विलायची खाण्याचे आणखी काही खास फायदे आहेत.
विलायची शक्तिशाली आणि उत्तेजक टॉनिक आहे. यामुळे केवळ शरीर सुदृढ होत नाही तर शीघ्रपतन, नपुंसकता रोखण्यात सक्षम आहे. विलायची दुधामध्ये टाकून उकळून घ्या. चांगल्याप्रकारे उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये मध टाकून हे दुध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास कमजोरी दूर होते. नपुंसकता दूर करण्यासाठी बदाम(एक, दोन), चारोळ्याचे दाणे (2 ग्रॅम) आणि तीन विलायची एकत्र कुटून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होईल.