अमिताभ बच्चन ‘अतुल्य भारत’ अभियानाचे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
नवी दिल्ली, 7 - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ‘अतिथी देवो भव’ म्हणणार आहेत. अमिताभ बच्चन यांची केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘अतुल्य भारत’ अभियानाचे नवे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आमीर खान अतुल्य भारत अभियानाचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल, असे पर्यटन विभागाने कालच जाहीर केले होते. असहिष्णुतेबाबत केलेले वक्तव्य आमीरला भोवल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आज महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. प्रसून जोशी मॅकेन एरिक्सन लिमिटेड या कंपनीसोबत 2.69 कोटी रुपयात ‘अतुल्य भारत’ अभियानाचा करार झाला होता. मात्र तो करार रद्द झाल्याने आता आमीर खान अतुल्य भारतचा
ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नसेल, असं पर्यटन विभागाने स्पष्ट केले.