Breaking News

जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनणार


सांगली, 31 - जिल्ह्यात पाण्याचे संकट गडद होत चालले आहे. नद्या, तलाव, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. दुष्काळीच नव्हे तर सुकाळी भागातही पाण्याचा साठा झपाट्याने खालावतो आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातून अवघे 20 टक्केच पाणी बाकी असून तेही संपत चालले आहे. 
पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. अवघे 20 टक्के पाणी शिल्लक असताना जून महिन्यापर्यंत जिल्ह्याला पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. एका बाजूला म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे राजकारण, पेंडिंग बिले, त्यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला बिले भरण्याबाबत कारखाने आणि लाभार्थ्यांची नकारार्थी मानसिकता, सारी बिले सरकारनेच भरण्याच्या मागणीसाठी तापणारी आंदोलने या सार्‍यात पाण्याचा प्रश्‍न मात्र ताणला जातो आहे. पाण्याची परिस्थिती बिकट आहे आणि पाण्याचे राजकारणही. सांगली जिल्ह्यात 5 मध्यम आणि 79 लघु प्रकल्प आहेत. आज मध्यम प्रकल्पात 8 तर लघु प्रकल्पात अवघा 14 टक्के पाणीसाठी उरला आहे. तोही झपाट्याने खालावतो आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सिद्धेवाडी, दोड्डानाला, संख प्रकल्प तर संपले आहेत. बसाप्पावाडीच्या प्रकल्पात जरासे पाणी राहिले आहे. 
एकूण 79 पैकी तासगाव तालुक्यात 7 लघु प्रकल्प असून त्यात 13 टक्के, खानापूर तालुक्यात 9 प्रकल्पांमध्ये 28 टक्के, कडेगाव - 6 प्रकल्पांमध्ये 38, शिराळा 5 प्रकल्पांमध्ये 25 टक्के, आटपाडी - 13 प्रकल्पात 34 टक्के, जत - 28 प्रकल्पांमध्ये अवघा 9 टक्के, कवठेमहांकाळ - 11 प्रकल्पात 24 टक्के, मिरज - 3 प्रकल्पात 14 टक्के, वाळवा - 2 प्रकल्पात 10 टक्के असा अवघा 20 टक्के पाणीसाठा बाकी आहे. मागील वर्षी याच दिवसात हा 
पाणीसाठी 29 टक्के होता.
जलयुक्त शिवार अभियान सुस्त ः टंचाईग्रस्त भागात अधिकाधिक पाणीसाठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रजासत्ताकदिनी कार्यक्रमात दिली खरी, पण टंचाईच्या परिस्थितीत ज्या वेगाने हे अभियान चालायला पाहिजे त्या वेगात ते कुठेच दिसून येत नाही. दुष्काळालाच संधी मानून जलसंधारण, जलयुक्त शिवार अभियान, तलावातील गाळ उपसणे, पाणी योजनांची दुरुस्ती करण्याची कामे व्हायला हवीत, पण ऐन गरजेच्या दिवसात ही कामे थंडावली आहेत. 141 गावात जलयुक्त शिवार अभियानातून कामे सुरु करण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 53 कामे पूर्ण झाली असून 307 कामे सुरु आहेत असे असले तरी खानापूर तालुक्यातील 15 गावात 564, कवठेमहांकाळ - 8 गावात 159, तासगाव - 24 गावात 355, मिरज - 13 गावात 509, कडेगांव - 9 गावात 396, आटपाडी - 30 गावात 508, जत-42 गावात 869 कामे पूर्ण करायची आहेत. या अभियानातून एकूण 3 हजार 
360 कामे पूर्ण केल्यानंतर जिल्ह्यात हे अभियान यशस्वी झाले असे म्हणणे योग्य ठरणार आहे. दुसर्‍या बाजूला यासाठी 38 कोटी 90 लाख खर्च झाला आहेच.
टँकरवर नजर ठेवण्याची गरज ः जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गंत 35 लाखाहून अधिक मजूर क्षमतेची जवळपास 7 हजार 561 कामे मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात 387 कामे सुरु असून त्यावर 5 हजार 180 मजूर काम करत आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसाठी 56 टँकरव्दारे 45 गावे व 313 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरु आहे. पण या अत्यंत महत्वाच्या गोष्टीतही प्रशासनाला गांभीर्य नाही. पाण्याच्या टँकरवर जाग्यावर जाऊन लक्ष ठेवण्याचीच गरज आहे.
तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आम्ही लढा उभारला आहे. गणपती संघाला तो खरोखरच चालवायचा असेल, तर त्यांनी विक्री व्यवहार कायम होऊन मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका पाठीमागे घेऊन, राज्य बॅँकेकडून दीर्घ मुदतीसाठीची निविदा प्रसिध्द करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कारखान्याचे माजी संचालक आर. डी. पाटील यांनी केले.