Breaking News

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना महापालिकेत श्रध्दांजली

सांगली, 31 -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी सांगली महापालिकेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सांगली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील आणि आयुक्त अजीज कारचे यांच्या हस्ते प्रथम स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महापालिका मुख्यालयात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त सुनील नाईक, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे,नगरसचिव चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी नकुल जकाते,शहर अभियंता आरपी जाधव,नगर अभियंता एच ए दीक्षित, विद्युत अभियंता अमर चव्हाण,प्रभाग अधिकारी वाकुडे,यशय्या तालुरी,नितीनकाका शिंदे,सिराज नायकवडे ,शिवाजी खरात आदी उपस्थित होते. यावेळी स्तबता पाळून महात्मा गांधी यांचा हुतात्मा दिवस पाळण्यात आला. यावेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील आणि आयुक्त अजीज कारचे,विरोधी पक्षनेता दिग्विजय सूर्यवंशी, नगरसचिव चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी नकुल जकाते आदींसह महापालिका कर्मचारी उपस्थित होते.