Breaking News

गांधी ग्रंथालयात विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, 31 - येथील महात्मा गांधी ग्रंथालयातर्फे विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सांगली शहराबरोबरच तासगाव, आष्टा, भिलवडी, बुधगाव, समडोळी आदी भागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 
स्पर्धांचा सविस्तर निकाल असा : हस्ताक्षर स्पर्धा : प्रथम- कुणाल इंगळे, द्वितीय- सोनल पाटील, तृतीय- हिमानी विभुते, उत्तेजनार्थ- मल्हार देशपांडे, अनुष्का कदम, सिध्दी सताळकर. निबंध स्पर्धा : प्रथम- अतुल चव्हाण, द्वितीय- प्रियांका खटके, आर्या भागवत, तृतीय- रविना सावंत. वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक विभाग) : प्रथम- अर्णव बापट, द्वितीय- सोनल पाटील, सखी कुलकर्णी, सिध्दी सताळकर, प्रज्ञा माळकर. वक्तृत्व स्पर्धा (माध्यमिक विभाग) : प्रथम- वैष्णवी शिंदे, द्वितीय- अमित लाळगे, तृतीय- चिमादेवी राठोड, उत्तेजनार्थ- ऋषिकेश शिंदे. वक्तृत्व स्पर्धा (महाविद्यालयीन विभाग) : प्रथम- सागर राडे, द्वितीय- वैभवी पिसे, तृतीय- सानिका हर्डीकर, उत्तेजनार्थ- जयश्री शेलार . चित्रकला स्पर्धा (लहान गट) : प्रथम- मिताली सुतार, द्वितीय- प्राची बनकर, तृतीय- अथर्व पाटील, उत्तेजनार्थ- ऐश्‍वर्या कुलकर्णी, स्वायमा पिंपरी, सानिका लिमये, श्रध्दा दबडे, आकांक्षा पाटील. मोठा गट : प्रथम- अनुष्का पाटील, द्वितीय- ऋतुराज खोमणे, तृतीय- वैभवी रेठरेकर, उत्तेजनार्थ- सनी तोडकर, ऋतुजा जाधव, वेदांत इंगळे, यश दिवाण. सांघिक गीत गायन स्पर्धा : प्रथम- थोरात अ‍ॅकॅडमी शांतिनिकेतन, द्वितीय- किडस् पॅराडाईज विश्रामबाग, तृतीय- विश्रामबाग विद्यालय, शांतिनिकेतन विद्यामंदिर, सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूल, उत्तेजनार्थ- शांतिनिकेतन माध्यमिक विद्यामंदिर मराठी माध्यम, सिटी हायस्कूल.