Breaking News

इंग्लंडप्रमाणे मोदी सरकार हिंमत दाखविणार?- सेना


मुंबई, प्रतिनिधी, दि. 21 - डेव्हिड कॅमरून यांच्याप्रमाणे उर्दू ऐवजी इंग्रजी व हिंदी आधी शिका असे मुस्लिमांना मोदी सरकार सांगणार काय असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.  कॅमेरून यांच्यासारखी हिंमत दाखवून मदरसे व तेथील उर्दू आणि अरबी भाषांमधून देण्यात येणारे शिक्षण बंद करावे. त्याऐवजी मदरशांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्या असे आपले सरकार सांगू शकले तरी या देशावर उपकार होतील, अशा शब्दांमध्ये सामना या मुखपत्रातून शिवसेनेने मोदी सरकारला टोला लगावला आहे. 
वर्षांनुवर्षे इंग्लंडमध्ये राहूनही कर्मठपणा सोडायला तयार नसणार्‍या महिला उर्दू व अरेबिक भाषेतून त्या 
व्यवहार करतात त्यांच्या डोक्यात इस्लामिक स्टेटचा विचार घुसवून आतंकवादी आपले नेटवर्क वाढवतात असे इंग्लिश सरकारला वाटत असेल तर ते चूक नाही. पंतप्रधान मोदी यांनी हे विचार स्वीकारून येथील धर्मांध मुसलमान समाजास दिव्यदृष्टी देण्याचा विचार मांडला पाहिजे. हिंदुस्थानात असे कटू निर्णय साखरेच्या पाकात घोळून धर्मांध मुसलमानांच्या गळ्यात उतरवता येतील काय? असा सवाल सेनेने केला आहे. 
भारतातील मदरशांतून नेमके काय शिकवले जातेय हे कोणालाही सांगता येणार नाही. मदरसे हे आतंकवादी बनवण्याचे कारखाने होत आहेत व धार्मिक शिक्षणाचा अट्टहास मुसलमान पोरांना पुन्हा त्याच डबक्यात टाकत आहे. त्यामुळे हे मदरसे व तेथील उर्दू-अरेबिकमधील शिक्षण बंद करून हिंदी व इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्या असे आपले सरकार डेव्हिड कॅमरूनच्या हिमतीने सांगू शकले तरी या देशावर उपकार होतील.