Breaking News

पठाणकोटमध्ये सर्च ऑपरेशन सुरूच! -- आतापर्यंत एकूण सहा अतिरेक्यांचा खात्मा


पठाणकोट, 4 - गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पठाणकोट हवाईतळावर आज दोन अतिरेक्यांचे मृतदेह मिळाले. या चकमकीत एकूण सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले आहे. परंतु पठाणकोट हवाईतळावर नेमके किती दहशतवादी घुसले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र हवाईदल, एनएसजी कमांडो आणि लष्कराच्या जवानांचे कॉम्बिंग ऑपरेशन अजूनही सुरु आहे. युनायटेड जिहाद कौन्सिलने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे कळते.
हवाई दलाच्या ज्या इमारतीत दोन दहशतवादी लपून बसले होते, ती इमारत पाडण्यात आली. इमारतीच्या ढिगार्‍यात दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. पठाणकोटमध्ये हवाई तळानजीकच्या एका इमारतीत हे दोन्ही दहशतवादी शिरले होते. तो रहिवासी परिसर असल्याने त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या.  दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानची चर्चा रद्द होऊ शकते. दोन्ही देशांमध्ये 15 जानेवारीला परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा होणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच रात्री म्हणजे शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला. पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी घुसून त्यांनी गोळीबार केला. शनिवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांपासून सुरूझालेली ही चकमक अद्याप सुरु
आहे. या चकमकीत भारताचे सात जवान शहीद झाले.