प्रजासत्ताक दिनी आयएसआयएसचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं लक्ष्य
नवी दिल्ली, 24 - प्रजासत्ताक दिनी आयएसआयएस पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. इंटीलिजन्सच्या रिपोर्टनुसार, त्यासाठी आयएस 12 ते 15 वर्षांच्या वयाच्या मुलांना बॉम्बरम्हणून तयार करत आहे.
अशी माहिती आहे, की इंटीलिजन्स रिपोर्टनंतर शुक्रवारपासून एसपीजी सह सर्व सुरक्षा यंत्रणा (एनएसजी, आयबी, दिल्ली पोलिस) अलर्टवर आहे. रिपोर्टनुसार, आयएस मोदींवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. आयएसच्या या सुसाइड स्कॉडमध्ये 2-3 मुले असण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते 12 ते 15 वर्षांच्या मुलांना शस्त्र आणि स्फोटके हताळण्याचे ट्रेनिंग देत आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते. 2015 मध्ये लालकिल्ल्यावर सुरक्षा कडे तोडत मोदी मुलांना भेटले होते. यंदा एनएसए अजित डोभाल आणि एसपीजीने पंतप्रधानांना अवाहन केले आहे, की सुरक्षा कडे तोडू नये. दिल्ली पोलिसांनाही संशयितांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्पेशल सेल देखिल सर्च ऑपरेशन करत
राहाणार आहे.