फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद आज भारताच्या दौर्यावर
नवी दिल्ली, 24 - फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद आजपासून भारताच्या दौर्यावर आहेत. फ्रांस्वा हे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
चंदिगडपासून ओलांद यांच्या भारत दौर्याची सुरुवात होणार आहे. दुपारी एक वाजता ओलांद चंदिगडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर रॉक गार्डन येथे मोदी आणि ओलांद यांची भेट होईल. त्यानंतर 4 वाजता ओलांद सीईओंच्या फोरमची भेट घेतील आणि त्यानंतर इंडो-फ्रान्स बिझनेस समिटमध्ये ते सहभागी होतील. संध्याकाळी 6 वाजता ते चंदीगडमधून दिल्लीसाठी रवाना होतील. या दौर्यात मोदी आणि ओलांद यांच्यात
द्विपक्षीय चर्चा होणार असून दहशतवाद, जलवायू परिवर्तन, स्मार्ट सिटी, अणुऊर्जा यासारख्या काही मुद्द्यांचा समावेश असेल.