’बिग बॉस 9’चा विजेता, प्रिन्सला 35 लाख रुपयांचे पारितोषिक
मुंबई, 24 -
प्रसिद्ध मॉडेल प्रिन्स नरुलाने ‘बिग बॉस’च्या नवव्या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे, तर ऋषभ सिन्हा हा उपविजेता ठरला. शनिवारी झालेल्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये या रिअॅलिटी शोचा विजेता घोषित करण्यात आला. प्रिन्सला 35 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या बिग बॉसचे नववे पर्वही दरवर्षीप्रमाणेच चांगलेच गाजले. प्रिन्स नरुलाने सुरुवातीपासूनच बिग बॉस 9 चा विनर होण्याचा दावा केला होता, त्याप्रमाणे त्याने करुन दाखवले. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या या शोमध्ये प्रिन्स शिवाय शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये मंदना करीमी, ऋषभ सिन्हा आणि रोशेल राव होते.