Breaking News

एस.टी. कामगार सेनेचा मेळावा

 बुलडाणा(प्रतिनिधी) ।30 - महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेचा भव्य विभागीय मेळावा मंगळवार 26 जानेवारी 2016 रोजी पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा येळगाव-बुलडाणा येथे संपन्न झाला. यावेळी शेगाव आगारातील एस.टी. कामगार संघटनेच्या सभासदांनी खा.प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेत जाहीर प्रवेश घेतला. 
जिल्ह्यातील इतरही संघटनेच्या सभासदांनी महाराष्ट्र एस.टी. कामगार सेनेत प्रवेश केला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.प्रतापराव जाधव, बुलडाणा लोकसभा मतदार संघ, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आ.डॉ.संजय रायमुलकर मेहकर विधानसभा संघ, आ.डॉ.शशिकांत खेडेकर सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे विभागीय अध्यक्ष एस.टी. कामगार सेना, बुलडाणा प्रमुख अतिथी दत्ताभाउ पाटील, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा प्रमुख, प्रमुख उपस्थिती सौ.सिंधुताई खेडेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख बुलडाणा शांताराम जगताप, जि.प.विरोधी नेते अशोक इंगळे, उपजिल्हा प्रमुख बुलडाणा प्रतापसिंह राजपुत, उपजिल्हाप्रमुख बुलडाणा अर्जुन दांडगे तालुका प्रमुख बुलडाणा, विठ्ठल येवले, माजी नगराध्यक्ष बुलडाणा, प्रमोद सनगाळे राज्य चिटणीस एस.टी.कामगार सेना हे प्रमुख्याने उपस्थित होते.